Ad will apear here
Next
लवकरच सागरी रुग्णवाहिका
मुंबई : मुंबई आणि रायगडसह कोकण किनारपट्टीच्या इतर भागांत लवकरच सागरी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. किनारपट्टीच्या भागांतील नागरिकांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ही सुविधा असेल. यापूर्वी देशात नर्मदा नदीवर तरंगता दवाखाना सुरू करण्यात आला होता. त्यात डॉक्टर, रुग्णसेविका, मदतनीस, चालक व इतर कर्मचारी उपलब्ध आहेत. 

काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी नागरिकांवरील उपचारांसंदर्भात नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर, ‘किनारपट्टीच्या भागांतील नागरिकांना उपचारांसाठी मुंबईत यावे लागते. हे लक्षात घेता प्रायोगिक तत्त्वावर ही उपाययोजना करण्यात आली आहे,’ असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. 

यानुसार मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया अशी सागरी रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी रायगड जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे. त्यांचा  अहवाल मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत ही सेवा सुरू करण्यात येईल. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. या रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर, औषधे, मदतनीस, अत्याधुनिक उपकरणे, खलाशी असे कर्मचारी असतील. आजच्या घडीला राज्यात मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांतील काही सागरकिनाऱ्यांवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीही डॉ. सावंत यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZQPBB
Similar Posts
चक्रीवादळ मुंबईजवळ धडकण्याची शक्यता; अतिदक्षतेचा इशारा मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे
मासेमारी प्रशिक्षणासाठी ‘मत्स्यप्रबोधिनी’ रायगड : राज्यातील सागरी मत्स्यव्यवसायामध्ये मच्छिमार युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘मत्स्यप्रबोधिनी’ प्रशिक्षण नौका बांधण्यात आली आहे. प्रशिक्षणाकरिता नौकेची आवश्यकता लक्षात घेऊन अलिबागमधील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकरिता ही नौका बांधण्यात आली आहे. या नौकेची लांबी १७.३५० मीटर असून, खोली २.४५० मीटर आहे
‘कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या’ मुंबई : ‘सन २०१०ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया होऊन ७० टक्के स्थानिकांना सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय करून कोकणातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा,’ अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे २६ जून रोजी विधानसभेत केली.
मुंबईत आंबा महोत्सवाचे आयोजन मुंबई : कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे मुंबई आणि उपनगरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आणि देवगड येथील शेतकरीच थेट आपल्या बागेतील हापूस आंबे आणून या महोत्सवात त्यांची विक्री करणार आहेत. मागील १४ वर्षांपासून या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.  दर वर्षीप्रमाणे यंदाही कोकण

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language